दूध आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक मानले जाते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रोज नियमितपणे दुधाचे सेवन करतात. दुधामध्ये शरीराला आवश्यक ती पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. आजकाल अनेक जण कच्चे दूध पितात. मात्र, कच्चे दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
## कच्चे दूध म्हणजे काय?
कच्चे दूध म्हणजे असे दूध ज्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. हे दूध तापवलेले नसते. गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि घोडी यांसारख्या प्राण्यांमधून दूध काढल्यानंतर ते थेट बाटलीत भरले जाते किंवा वापरले जाते. नैसर्गिक स्वरूपातील पोषण देते असे मानले जात असले, तरी त्यात सूक्ष्मजीवांचा धोकाही राहू शकतो. काही जणांच्या मते कच्चे दूध प्यायल्याने ॲलर्जी, दम्याचा त्रास किंवा पचनाची समस्या कमी होण्यास मदत होते असे मानले जाते.
## तापवलेले दूध का चांगले?
सहसा दूध पिण्यापूर्वी आपण ते गरम करतो. गरम केल्याने त्यातील हानिकारक जिवाणू नष्ट होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये लिस्टेरिया आणि साल्मोनेला यांसारखे जीवाणू असू शकतात. या जिवाणूंमुळे शरीरात इन्फेक्शन होऊ शकतो, तसेच ते पचायला जड असू शकते. त्यामुळे दूध कच्चे प्यावे की तापवून प्यावे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा