गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण दिसत होती. मात्र आज, 27 नोव्हेंबर रोजी दोन्ही धातूंच्या दरांनी अचानक मोठी झेप घेतली. सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक ठरली आहे.
एमसीएक्सवर सोने-चांदी महागले
एमसीएक्सवर आज जाहीर झालेल्या दरांनुसार सोने प्रति 10 ग्रॅम 1,23,957 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदी 5,498 रुपयांनी महागली आहे. चांदी आता प्रति किलो 1,51,341 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सोन्याने पुन्हा एकदा मान वर काढल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत 2.73 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळेच देशांतर्गत बाजारातही दर वाढले आहेत. सोने आणि चांदीचे दर सध्या अस्थिर राहिले असून त्यात दररोज चढउतार सुरू आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ताजे दर तपासणे महत्त्वाचे ठरत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा