, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नंदुरबारमध्ये भूकंपाची अफवा; अवैध ब्लास्टिंग उघड, १९ लाख दंड

नंदुरबारमध्ये पहाटे जमीन हादरल्याने भूकंपाची अफवा पसरली; मात्र तपासात मुरूम उत्खननासाठीचे अवैध स्फोट कारणीभूत असल्याचे उघड झाले. कंपनीला १९ लाखांचा दंड झाला.

नंदुरबारमध्ये भूकंपाची अफवा; अवैध ब्लास्टिंग उघड, १९ लाख दंड

नंदुरबारमध्ये पहाटे अचानक भूकंपासारखे हादरे बसले. त्यामुळे झोपेत असलेले नागरिक जागे झाले आणि घाबरून त्यांनी थेट घराबाहेर धाव घेतली. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात पहाटे जमीन हादरली. घरातील वस्तू देखील खाली पडल्या. त्यानंतर शहरामध्ये भूकंप आला, अशी चर्चा होऊ लागली. भूकंप झाल्याच्या अफवेने घबराट पसरली आणि भूकंप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली.

मात्र, या थरकापामागचे धक्कादायक सत्य समोर आले. हा भूकंप नसून स्फोटके लावून करण्यात आलेले अवैध ब्लास्टिंग असल्याचे उघड झाले. धुळे चौफुलीच्या टेकड्यांवर श्री गणपती भारत प्रा. लि. कंपनीने मुरूम उत्खननाच्या नावाखाली डोंगरात भयंकर स्फोट घडवल्याचे समोर आले. पहाटेच्या सुमारास परिसर अचानक हादरल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची भीती पसरली होती.

परवानगीपेक्षा जास्त उत्खनन

श्री गणपती भारत प्रा. लि. कंपनीला फक्त १ हजार १०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी होती. परंतु कंपनीने नियम धाब्यावर बसवून स्फोटकांचा वापर करत अवैधरित्या तब्बल ३०० ब्रास दगडाचे उत्खनन केले. या गंभीर प्रकाराची दखल घेत नंदुरबारचे तहसीलदार संतोष डेरे यांनी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

कंपनीला १९ लाखांचा दंड

संबंधित कंपनीला १९ लाख ९ हजार ९२० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून उत्खनन आणि वाहतूक तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. या कंपनीने स्फोटकांच्या मदतीने ३०० ब्रास दगडाची चोरी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंप मापकावर ३.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली होती.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance