आचार्य चाणक्य यांना भारतातील अत्यंत बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञ मानले जाते. त्यांनी मानवी जीवनाच्या हितासाठी अनेक नीती आणि तत्त्वे सांगितली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून जीवनाची शिकवण मिळते, तर काही नीतींमधून जीवनाचे कटू सत्य समजते. चाणक्य नीतीत अशा काही सवयींचा उल्लेख आहे, ज्या अंगीकारल्यास माणसाला आयुष्यभर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
स्वतःची कामे इतरांवर टाकणे
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जी व्यक्ती आपली कामे स्वतः करण्याऐवजी इतरांवर अवलंबून राहते, ती कधीच धनवान होऊ शकत नाही. अशा लोकांना आयुष्यभर संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतःची कामे इतरांवर लादणारी व्यक्ती कोणत्याही कामाबाबत सतर्क नसते आणि कामाच्या ठिकाणी ती अपयशी ठरते. त्यामुळे आपली कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करावा, असे चाणक्य सांगतात.
कटू वाणी आणि आळस
कठोर आणि कटू वाणी भाग्य कमजोर करते, असे चाणक्य म्हणतात. ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवा नसतो, त्यांच्यापासून लोक हळूहळू अंतर ठेवतात. असे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडतात. ज्यांची वाणी कठोर असते, त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नसते, असे मानले जाते. त्यामुळे वाणीत गोडवा असावा आणि मित्र-मैत्रिणींशी सलोख्याने वागावे, असे सांगितले जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला गेला आहे. आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्तीची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. आळस क्षमता आणि वेळ नष्ट करतो, त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडणे कठीण होते. वरील बाबी पारंपरिक मान्यतेनुसार माहिती म्हणून दिल्या आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा