‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा भूमिकेमुळे नव्हे, तर पती हिमालय दासानी यांच्यासोबतच्या रोमँटिक क्षणांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हिमालय यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने त्यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केले. दोघांचे किस, मिठी आणि डान्स करतानाचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
57 व्या वर्षीही कायम असलेली केमिस्ट्री
वयाच्या 57 व्या वर्षीही या जोडप्यातील प्रेम आणि केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. भाग्यश्रीने पती हिमालय दासानी यांच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनमधील काही रोमँटिक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिमालय पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यांनी भाग्यश्रीला लिप किस केले, तर कधी प्रेमाने मिठीत घेतले. दोघेही एकत्र डान्स करत आणि आनंदाचे क्षण साजरे करतानाही दिसले. या फोटोंमध्ये दोघांमधील सहजता आणि एकमेकांबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील रोमँटिक अंदाज कायम असल्याचे चाहते म्हणत आहेत.
पतीसाठी खास बर्थडे नोट
हिमालय यांच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने त्यांच्यासाठी एक खास बर्थडे नोटही लिहिली. आपल्या आयुष्यातील असा माणूस, जो प्रत्येक दिवस रोमांचक, मजेशीर आणि थोडा नाट्यमय बनवतो, अशा शब्दांत तिने पतीचे वर्णन केले. आयुष्याच्या नव्या वर्षात दोघांनी मिळून आणखी आठवणी तयार कराव्यात, काही अनोख्या गोष्टी अनुभवाव्यात आणि नेहमीप्रमाणे थोडी मस्ती करावी, अशी भावना तिने व्यक्त केली. भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांचे लग्न 1989 मध्ये झाले. या दोघांच्या संसाराला आता 37 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या दाम्पत्याला अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुले आहेत. भाग्यश्रीने सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. या चित्रपटानंतर ती अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर राहिली होती. मात्र त्यानंतर तिने पुन्हा अभिनयक्षेत्रात काम सुरू केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा