मुंबईतील माहीम परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानावर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. शोभा हॉटेलजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दिशेने अज्ञात हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले. या घटनेत दुकानाची काच फुटली, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर आता मुंबईतही अशी घटना घडल्याने शहरात चिंता व्यक्त होत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जण पल्सर दुचाकीवरून वांद्रेच्या दिशेने आले. सिग्नलवरून यू टर्न मारून त्यांनी ज्वेलर्स दुकानावर गोळीबार केला. दोघांनीही हेल्मेट घातलेले असल्याने त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
जीवितहानी नाही; पोलीस तपास सुरू
गोळी लागल्याने दुकानाची काच फुटली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून गोळीबारामागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख याबाबत तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा