, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सुळे मुख्यमंत्री झाल्यास पवारांची विश्वासार्हता संपेल: हाके

हाके यांनी नांदेडमध्ये सुळे मुख्यमंत्री होण्यावर भाष्य केले. सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्यास पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता संपेल, असे ते म्हणाले.

सुळे मुख्यमंत्री झाल्यास पवारांची विश्वासार्हता संपेल: हाके

रोहित पवारांकडून काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा आणि सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची चर्चा या सगळ्याची स्क्रिप्ट दिल्लीतून आल्यासारखी वाटतेय, असे वक्तव्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. राजकारणात काहीही घडू शकते. महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा आणि पातळी खालावली आहे, असेही हाके म्हणाले. ते बुधवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या एनडीए आघाडीत घेण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुळे मुख्यमंत्री झाल्यास काय होईल, हाकेंचे म्हणणे

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार आहेत, यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने काय बोलावे, असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची आजवरची विश्वासार्हता संपुष्टात येईल, असे हाके म्हणाले. त्यामुळे पवार कुटुंबाभोवती फिरणारे राजकारण आणि वलयही संपेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

रोहित पवारांच्या मोर्चावरही प्रश्नचिन्ह

रोहित पवारांची धडपड ही मंत्रिपदासाठी आहे की, खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचे आहे, हे काळानंतर समोर येईल, असेही हाके म्हणाले. रोहित पवार एका बाजूला कारखाने चालवतात, दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतात. शेतकरी आणि उद्योगपती अशा दोन भूमिकांमध्ये ते वावरत आहेत. हेच पवार कुटुंबाचे राजकारण आहे, त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे हाके म्हणाले. रोहित पवारांना त्यांचे नेतृत्व सिद्ध करावे लागेल, असेही ते म्हणाले.

हाके यांनी पुढे सांगितले की, व्हीएसआर कंपनीसोबत सर्वाधिक संबंध हे पवार कुटुंबाचे आहेत. व्हीएसआर कंपनी ही अजित पवार यांची चॉईस होती. रोहित पवारही या कंपनीच्या विमानांचा वापर करायचे. आता रोहित पवार मफलर दाखवून फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. रोहित पवार हे सध्या राजकारणात त्यांची स्पेस शोधत आहेत, असे हाके म्हणाले.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance