सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
आजचे सोन्याचे दर
आज 24 कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरात 2,610 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1,25,890 रुपये खर्च करावे लागतील. तर 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरात 26,100 रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी आज 12,58,900 रुपये मोजावे लागतील.
22 कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरात 2,400 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोने खरेदीसाठी ग्राहकांना 1,15,400 रुपये खर्च करावे लागतील. 22 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरात 24,000 रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी 11,54,000 रुपये मोजावे लागतील.
18 कॅरेटचे एक तोळा सोने आज 1,960 रुपयांनी वाढले असून, ते खरेदीसाठी 94,420 रुपये खर्च करावे लागतील. 18 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरात 19,600 रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी 9,44,200 रुपये मोजावे लागतील.
चांदीचे दर स्थिर
दरम्यान, आज सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला, पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज एक ग्रॅम चांदीचा दर 165 रुपये आहे. सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर तपासून मगच निर्णय घ्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा