बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या थार गाडीच्या चालकाने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. ही घटना बारामतीच्या सम्यक चौकात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक पोलीस दत्तात्रय भोसले हे सम्यक चौकात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत होते. त्यावेळी वाहतूक नियम मोडणाऱ्या एका थार गाडीला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने गाडी थांबवण्याऐवजी वेग वाढवला आणि भोसले यांना गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले.
## पोलीस गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
या घटनेत पोलीस हवालदार दत्तात्रय भोसले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
## चालक फरार, शोध सुरू
या धक्कादायक घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. दत्तात्रय भोसले यांच्या तक्रारीवरून अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा