शाकाहार आणि मांसाहार यावरून नेहमीच चर्चा रंगते. एखादा पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी, यावरून तो खायचा की नाही हे अनेकजण ठरवतात. शाकाहारी लोक उपवासाच्या दिवशी आवडीने फळे खातात. मात्र या जगात एक असे फळ आहे, ज्याला मांसाहारी फळ म्हटले जाते. विशेष म्हणजे भारतातही हे फळ आवडीने खाल्ले जाते. त्या फळाचे नाव अंजीर असे आहे.
अंजीर मांसाहारी का मानले जाते?
अंजिराच्या झाडावर फुलांचे परागीकरण करण्याचे काम एका छोट्या कीटकाकडे असते. हा कीटक अंजिराच्या फळाला छिद्र पाडून आत शिरतो. मात्र एकदा आत गेल्यावर त्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे तो कीटक फळाच्या आतच मरून जातो. त्याचे अवशेष अंजीर फळातच राहतात आणि काही वेळाने त्यांचे विघटन होते. याच कारणामुळे काही लोक अंजीरला मांसाहारी फळ म्हणतात.
अंजीर खाण्याचे फायदे
अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि लोह यांसारखी पोषक तत्त्वे असतात. हे फळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, असे सांगितले जाते. त्यामुळे अंजीर हे आरोग्यासाठी उपयुक्त फळ मानले जाते. मात्र कोणताही आहार बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
प्रतिक्रिया व्यक्त करा