, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकरी झाले हमाल! एपीएमसीत ७० किलोच्या गोण्या

दुष्काळामुळे पीक जळून गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट भागातील शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी थेट नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात हमाली करू लागले आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकरी झाले हमाल! एपीएमसीत ७० किलोच्या गोण्या

दुष्काळाच्या भीषण संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. ज्या हातांनी शेतात राबून सोन्यासारखे पीक घेतले आणि लाखोंचे पोट भरले, त्याच हातांवर आज स्वतःच्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेत हमाली करण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट भागातील शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी थेट नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाले आहेत.

पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पीक डोळ्यांदेखत जळून गेल्याने या शेतकऱ्यांवर आता हमालीची वेळ आली आहे. मुंबईत माणूस सकाळी उपाशी उठू शकतो, मात्र उपाशी झोपत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटाने बेजार झालेला शेतकरी एपीएमसी बाजारात मान झुकवून ५० ते ७० किलो वजनाच्या गोण्या पाठीवर वाहत आहे.

मदत तुटपुंजी असल्याची खंत

एकीकडे सरकारकडून आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या जातात, मात्र डोंगराएवढ्या संकटासमोर ही मदत अगदीच तुटपुंजी ठरत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. दुष्काळामुळे शेतातच काही उगवले नाही, तर एपीएमसी बाजारात शेतमाल तरी येणार कुठून, अशी भीतीही या शेतकऱ्यांना सतावत आहे.

पुढील पावसाळ्यापर्यंतची चिंता

बाजारात मालच आला नाही, तर इथले कामही थांबेल आणि पुढील पावसाळ्यापर्यंत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. लाखांचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला आता संकटसमयी मदतीची गरज आहे. सरकार ठोस मदतीच्या रूपात हात देणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance