नवीन वर्ष सुरू होण्यास आता सुमारे एक महिना बाकी आहे. अनेक जण नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी गृहप्रवेशाचा कार्यक्रम करण्याचा विचार करत आहेत. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. वास्तू नियमानुसार काही चुका टाळल्यास नव्या घरात सुख आणि शांतता नांदते, अशी मान्यता आहे.
गृहप्रवेशापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
कोणत्याही घरात प्रवेश करण्यापूर्वी घरात कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. वास्तू नियमानुसार नव्या घरात जाण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर पूजा करणे आवश्यक मानले जाते. तसेच नव्या घरात जाताना एखाद्या देवाची प्रतिमा किंवा फोटो सोबत न्यावा.
फुटलेल्या वस्तू आणि रिकामे घर टाळा
नव्या घरात फुटलेल्या वस्तू घेऊन जाऊ नयेत. अनेकदा नकळत फुटलेल्या वस्तू नव्या घरात नेल्या जातात, मात्र वास्तू नियमानुसार ते योग्य मानले जात नाही. घरात फुटलेल्या वस्तू ठेवल्याने नकारात्मकता निर्माण होते, असे मानले जाते. गृहपूजा केल्यानंतर घर अधिक काळ रिकामे ठेवू नये; पूजेनंतर लवकरात लवकर नव्या घरी राहायला जावे. उशिरा राहायला गेल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी मान्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा