आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील लेझाई देवानबारी कैबर्ता गावात एका बिबट्याने धुमाकूळ घातला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने पसरला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तीन ग्रामस्थ जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात कुलमणी दास, फुलेश्वर दास आणि रूपेश्वर दास हे तिघे ग्रामस्थ जखमी झाले आहेत. हल्ल्यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी लेझाई मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वनविभागाची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने जाळे फाडून तेथे उपस्थित असलेल्या लोकांवर हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने जखमी अवस्थेतील बिबट्याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Leave a Reply