अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अदानी समूहाच्या प्रस्तावित वीज प्रकल्पाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होईल आणि आदिवासी बांधवांचे स्थलांतर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार बळवंत वानखडे आक्रमक
अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे, यासाठी संसदेमध्ये प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासींच्या मूलभूत सुविधांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रकल्पामुळे परिसरातील आदिवासी समाजावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधत काँग्रेसने प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पाणीटंचाईचा आढावा
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply