मुलाची भेट घेऊन आनंदाने आपल्या गावी परतणाऱ्या वृद्ध पती-पत्नीला वाटेतच काळाने गाठले. गावी परतत असताना भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नी कंटेनरखाली चिरडले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
गंगापूर चौफुलीजवळ भीषण अपघात
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर चौफुलीजवळ घडली. अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे पुंडलिक कचरू रोकडे (वय ६५) आणि पार्वताबाई रोकडे (वय ६०) अशी आहेत. हे दाम्पत्य मुलाची भेट घेऊन गावी परतत होते.
परिसरात हळहळ
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रोकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Leave a Reply