दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पात्र विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दीड लाख विद्यार्थ्यांना लाभ
या निर्णयामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार २७९ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी ५० टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
जिल्हानिहाय निधीचे वाटप
यासाठी जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांना ६ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. दरम्यान, परीक्षा शुल्क माफ असतानाही विद्यार्थ्यांकडून हमीपत्रे का मागितली जातात, असा सवाल उपस्थित करत ही अट रद्द करून शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनाही तातडीने शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा