आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील अनेक गोष्टी आजच्या काळातही लागू पडतात, असे मानले जाते. राजा धनानंद याने चाणक्यांचा अपमान केला होता. त्यानंतर चाणक्यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर बलाढ्य धनानंदचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवले, अशी आख्यायिका आहे. चाणक्यांच्या मते यश सहज मिळत नाही. त्यासाठी कष्ट करावेच लागतात. केवळ कष्ट पुरेसे नसतात, त्याला नशिबाची साथही हवी असते. मात्र, काही गुण असे आहेत, जे माणसाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतात. हे गुण असलेल्या व्यक्तीला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे चाणक्य म्हणतात.
स्वयंशिस्त — स्वतःवरचे नियंत्रण
चाणक्यांच्या मते स्वयंशिस्त हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गुण आहे. हा गुण प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच हवा. ज्याच्याकडे स्वयंशिस्त आहे, तो संपूर्ण जग जिंकू शकतो. थोडक्यात स्वयंशिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणे. ज्या व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण आहे, ती व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होते. त्यामुळे स्वयंशिस्तीला चाणक्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले आहे.
आर्थिक बचत — संकटकाळाची तयारी
दुसरा गुण म्हणजे आर्थिक बचत. अनेकांना पैसा खर्च करण्याची सवय असते. जे लोक मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात आणि बचत करत नाहीत, ते भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकतात, असे चाणक्य म्हणतात. जो व्यक्ती संकटाच्या काळासाठी पैशांची बचत करतो, तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे बचत ही महत्त्वाची सवय आहे.
हे दोन्ही गुण आत्मसात केले, तर प्रगतीचा मार्ग सुकर होतो, असा चाणक्य नीतीचा सल्ला आहे. कष्ट, नशीब, स्वयंशिस्त आणि बचत — या चार गोष्टींचा समतोल साधला, तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा