मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; मॅपिंगचे काम बंद पाडले

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात मॅपिंगसाठी कर्मचाऱ्यांना विरोध झाला; शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं.

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; मॅपिंगचे काम बंद पाडले

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रशासनाकडून महामार्गाच्या मॅपिंगचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ही बाब समजताच शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि मॅपिंगला तीव्र विरोध केला.

मॅपिंगच्या कामावरून वाद

यावेळी शेतकरी आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या मशीन आणि वाहनांचे नुकसान केल्याची माहिती आहे. तसेच मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शेतकऱ्यांनी मॅपिंगचे काम बंद पाडले असून, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात त्यांची भूमिका कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance