रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिल्याची घोषणा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली आहे. भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात रोहित पवार आवाज उठवत असल्याचं लोंढे यांनी नमूद केलं. भाजप सरकारने शेतकऱ्यांना नागवलं असून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही, असंही लोंढे म्हणाले.
राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
या ट्रॅक्टर मोर्चाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र वेगळी भूमिका दिसून आली. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. रोहित पवार यांनी यापूर्वीही स्वतंत्र मोर्चे काढले होते, त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक उपक्रम असल्याचं सूचित होतं, असं शिंदे यांनी सांगितलं.
रोहित पवारांच्या भवितव्याबाबतच्या चर्चा फेटाळल्या
रोहित पवार शरद पवारांपासून वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याच्या किंवा काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा लोंढे यांनी फेटाळल्या. रोहित पवार भाजपच्या विरोधात रान उठवत आहेत आणि लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाच्या माध्यमातूनच हे काम करत असल्याचं लोंढे यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply