मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; आयुक्त डॉ. भारूड यांचे निर्देश

नोव्हेंबरअखेर कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची सूचना आयुक्त डॉ. भारूड यांनी दिली. नगररचना विभागाला १५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.

ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; आयुक्त डॉ. भारूड यांचे निर्देश

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे ठरावीकच ठेकेदार करत असून, इतर ठेकेदार कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नोव्हेंबरअखेर ज्या ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नसतील, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. त्यासाठी शहर अभियंत्यांनी बुधवारी सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

विभागांच्या कामकाजाचा आढावा

महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. भारूड यांनी आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची कामे, अमृत योजना, फेरीवाले आणि नगररचना विभागाची वसुली यांसह विविध प्रशासकीय कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी किती कामे प्रलंबित आहेत आणि किती प्रगतिपथावर आहेत, याची माहिती घेऊन कामांना गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

१५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

संभाव्य परिस्थितीचा विचार करून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करावे आणि मे महिन्यात आवश्यकता भासल्यास या विहिरींचा वापर करता येईल, यासाठी डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जल अभियंत्यांना देण्यात आल्या. नगररचना विभागाने ३१ मार्च २०२७ पर्यंत १५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या मालमत्तांना अद्याप घरफाळा आकारणी झालेली नाही किंवा ज्या मालमत्तांमध्ये वाढीव बांधकाम झाले आहे, अशा ठिकाणी नियमानुसार दंडासह घरफाळा आकारणी करावी, असेही बैठकीत ठरले.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, संजय सरनाईक आणि राम काटकर तसेच शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance