बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जातात आणि त्यांची चाहत्यांची संख्या सातासमुद्रापार पसरलेली असते. अशाच एका अभिनेत्रीबद्दलचा एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे. अभिनेत्री पूजा बेदी हिने स्वतः हा किस्सा सांगितला आहे. १९९३ मध्ये ती ‘लुटेरे’ या चित्रपटात दिसली होती. त्या वेळी तिने घातलेल्या बिकिनीचा लिलाव झाला होता.
१५०० रुपयांना बिकिनीची खरेदी
पूजाने कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. मे १९९३ मध्ये मुंबईतील क्रॉसवर्ड येथे ‘फॉरएव्हर यॉर्स’ या नावाने एक खास लिलाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कलाकारांनी घातलेले कपडे आणि इतर वस्तूंचा लिलाव झाला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पूरन सिंह यांनी केले होते. या लिलावात पूजा बेदीच्या बिकिनीसाठी एका व्यक्तीने १५०० रुपयांची बोली लावली आणि ती खरेदी केली.
खरेदीदाराचा त्रास लग्नापर्यंत सुरू
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची दीवानगी तिथे संपली नाही. पूजाने सांगितले होते की, तो माणूस तिला बराच काळ त्रास देत होता. त्याने आपले नाव तिच्या आवडत्या परफ्यूम ‘अनाइस-अनाइस’च्या नावावर ठेवले होते. इतकेच नाही, तर तो तिला अनेकदा फोन करत असे आणि रक्ताने लिहिलेली पत्रेही पाठवत असे. एके दिवशी त्या व्यक्तीने मर्यादा ओलांडली. तो माणूस लिलावात खरेदी केलेली बिकिनी घेऊन तिच्या घरी पोहोचला. पूजाने त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वागण्यामुळे ती त्रासलेली होती. पूजाने सांगितले होते की, हे सर्व तिचे लग्न होईपर्यंत सुरू राहिले.
Leave a Reply