हिवाळ्यात कांद्याच्या पातीची भाजी आवर्जून खाल्ली जाते. ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक असते. तिची रेसिपी अत्यंत सोपी असून घरच्या घरी सहज बनवता येते.
साहित्य
कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, तेल आणि मीठ हे साहित्य लागेल.
बनवण्याची पद्धत
आधी कांद्याच्या पातीची भाजी स्वच्छ निवडून, धुवून घ्यावी. यानंतर भाजी बारीक चिरून घ्यावी. गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्याव्यात. या मिश्रणात बारीक चिरलेली कांद्याच्या पातीची भाजी मिक्स करावी आणि भाजी चांगली परतून घ्यावी. भाजीत मीठ घालावं. त्यानंतर भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावं. अशा प्रकारे घरच्या घरी कांद्याच्या पातीची भाजी तयार होईल.
Leave a Reply