महेश्वरी साड्यांना सध्या महिलांची विशेष पसंती मिळत आहे. सणासुदीला आणि लग्नकार्यासाठी महिला महेश्वरी साड्यांची निवड करतात. लेटेस्ट पॅटर्न आणि रंगांमुळे या साड्या सध्या चर्चेत आहेत.
जांभळा आणि गुलाबी रंग
महेश्वरी साड्यांमध्ये जांभळा रंग अधिक उठून दिसतो. या साडीवर सोनेरी रंगाची बॉर्डर असते, त्यामुळे ती अधिक सुंदर दिसते. गुलाबी रंगाच्या महेश्वरी साडीवरच्या बुटी वर्क डिझाईनमुळे पारंपारिक लूक मिळतो.
मोरपंखी आणि मरून रंग
मोरपंखी रंगाच्या महेश्वरी साड्याही सध्या महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. मरून रंगाच्याही महेश्वरी साड्या सण आणि लग्नकार्यासाठी निवडल्या जातात.
Leave a Reply