देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये २०२७ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे सांगण्यात येत आहे.
मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा यंदा थोडी उशिरा होऊ शकते. ही घोषणा १५ जानेवारी २०२७ च्या आसपास होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मतदान कधी सुरू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, या पाच राज्यांमध्ये मतदानाला २२ फेब्रुवारीनंतर सुरुवात होऊ शकते. उत्तर प्रदेशातील निवडणूक ३ ते ४ टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.
तयारी वेगात
पाचही राज्यांमध्ये निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply