मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सारा लवकरच बॉलिवूडच्या देओल कुटुंबाची सून होणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांचा धाकटा मुलगा राजवीर देओल याच्यासोबत सारा तेंडुलकर २०२७ मध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. तसेच राजवीर हा साराला महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याच्या अफवाही या पोस्टमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या दोघांच्या कथित नात्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि राजवीर देओल यांच्या लग्नाबाबतची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये राजवीर साराला काही महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचाही दावा करण्यात आला होता. तसेच ते दोघे २०२७ मध्ये विवाहबंधनात अडकू शकतात, असेही म्हटले जात आहे. या व्हायरल पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
याआधीही साराच्या नावाची चर्चा
याआधीही साराच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. यापूर्वी तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात होते. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या, मात्र दोघांनीही यावर कधीही अधिकृत स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर २०२५ मध्ये साराचे नाव अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत देखील जोडले गेले होते. ते दोघे एकमेकांना डेट करत असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांचीही भेट घालून दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या चर्चांनाही दोघांनी कोणताही दुजोरा दिला नव्हता.
दरम्यान, आता साराचे नाव राजवीर देओल याच्यासोबत जोडले जात आहे. राजवीर देओल याने २०२३ मध्ये ‘दोनों’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता सारासोबत त्याचे नाव जोडले जात असल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या सारा आणि त्याच्या लग्नाबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत. मात्र, या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे २०२७ मध्ये राजवीर आणि सारा खरंच लग्न करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Leave a Reply