सोशल मीडियावर सध्या एका चर्चेने जोर धरला आहे. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
सारा तेंडुलकर ही सनी देओल यांचा मुलगा राजवीर देओल याच्यासोबत लग्न करणार असल्याचा दावा काही पोस्टमधून केला जात आहे. दोघांचा विवाह २०२७ मध्ये होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दाव्यांमध्ये काय म्हटले जात आहे?
दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नासंदर्भात चर्चा सुरू असल्याचा आणि राजवीरकडून साराला महागड्या भेटवस्तू पाठवल्या जात असल्याचाही दावा केला जात आहे.
या चर्चांबाबतची तथ्य तपासणी करण्यात आली असून हे दावे सोशल मीडियावरील पोस्टमधून केले जात असल्याचे समोर आले आहे.
Leave a Reply