हिवाळा सुरू झाला की बाईक चालवणाऱ्यांच्या अडचणी वाढतात. सकाळी तापमान कमी असताना बाईक सुरू करताना त्रास होऊ शकतो. काही बाईक एका प्रयत्नात सुरू होतात, तर काहींना सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे अनेकजण बाईक सुरू केल्यानंतर काही मिनिटे ती जागेवरच चालू ठेवतात, जेणेकरून प्रवास सुरू करण्यापूर्वी इंजिन व्यवस्थित काम करू लागेल.
इंजिन गरम करणे गरजेचे आहे का?
आता बाईकच्या तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. आधुनिक बाईकमध्ये फ्यूल इंजेक्शन आणि वेगवेगळे सेन्सर असतात, जे थंड हवेनुसार इंजिनचे काम नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे थंडीत बाईक सुरू केल्यानंतर किती वेळ थांबावे आणि इंजिन गरम करणे का गरजेचे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
Leave a Reply