राज्यात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. राज्यातील दुष्काळामुळे प्रमुख नेत्यांकडून मदत आणि दौरे केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या जात आहेत. एकनाथ शिंदे सातत्याने आढावा घेत आहेत. आता शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षांकडूनही सर्व आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेना नगराध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना नगराध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नगराध्यक्षांच्या भागातील दुष्काळग्रस्त भाग, शेतकरी आणि पाणीटंचाई अशा विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या निवडणुका, महायुतीमधील वाद आणि भांडणे यावरही महत्त्वाची चर्चा होणार आहे. तसेच पक्ष कसा वाढवायचा आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काय केले पाहिजे, यावरही चर्चा होणार आहे.
सोलापूर दौऱ्यानंतर बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी शिंदेंनी विठुरायाला साकडेही घातले. मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर वारकरी म्हणून आलोय. बळीराजावरील संकट आणि दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला साकडे घातले.
दरम्यान, परभणीच्या पाथरी नगरपरिषदेतील वादावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिथे एका महिन्यापूर्वी दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे पाथरीच्या वादावरही बैठकीत चर्चा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
Leave a Reply