चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता चिघळण्याची चिन्हे आहेत. जमीन देण्यास बारा गावांतील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव
चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत विरोध दर्शविला. धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.
ऑडिओ क्लिप व्हायरल
यावेळी मुनगंटीवार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस शिपायाशीही संवाद साधला. शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी कशी करता, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी भाजपला संपवायला निघाले का, असेही म्हटल्याचे या क्लिपमध्ये ऐकू येते. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली असून या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply