तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चाहूल लागली आहे. राज्यातील कोलाथूर विधानसभेच्या जागेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाचे आमदार व्ही. एस. बाबू यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन स्वतः मैदानात उतरणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कोलाथूरशी स्टॅलिन यांचे जुने नाते
एम. के. स्टॅलिन हे २०११ सालापासून कोलाथूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत व्ही. एस. बाबू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव केला होता. त्याच मतदारसंघात स्टॅलिन यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता बाबू यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्याने स्टॅलिन यांच्यापुढे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे.
डीएमकेसमोर पोटनिवडणुकीची संधी
तामिळनाडूमध्ये डीएमकेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विजय यांच्या पक्षाने डीएमकेला सत्तेतून खाली खेचले होते. आता व्ही. एस. बाबू यांच्या निधनानंतर रिक्त होणाऱ्या जागेच्या पोटनिवडणुकीत डीएमकेला पुन्हा जागा जिंकण्याची संधी आहे. डीएमकेतील काही नेत्यांनी एम. के. स्टॅलिन यांनी पुन्हा निवडणुकीत उतरावे, अशी विनंतीही केली आहे. त्यामुळे स्टॅलिन पोटनिवडणुकीत उतरून मुख्यमंत्री विजय यांना धक्का देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply