पैठणी ही महिलांच्या आवडीची साडी आहे. सध्या मुनिया पैठणी या साडीचे महिलांमध्ये विशेष आकर्षण आहे. पैठणी घ्यायची असेल, तर मुनिया पैठणी निवडणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. मुनिया पैठणीमध्ये सध्या पाच नवे पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत. प्रत्येक पॅटर्नची स्वतःची वेगळी ओळख आहे.
सिंगल आणि ट्रिपल मुनिया बॉर्डर
सिंगल मुनिया बॉर्डर पैठणी पॅटर्नमध्ये साडीच्या जरी काठावर एका रांगेत नाजूक पोपटांची नक्षी असते. त्यामुळे ही साडी खूप लोकप्रिय आहे. ज्यांना राजेशाही लूक हवा असतो, त्यांच्यासाठी ट्रिपल मुनिया बॉर्डर हा उत्तम पर्याय आहे. या साडीच्या काठावर पोपट नक्षीकामाच्या तीन समांतर रांगा असतात, ज्यामुळे साडीला अधिक उठावदार आणि पारंपारिक रूप मिळते.
बांधणी, पीकॉक पल्लू आणि टिश्यू सिल्क
बांधणी-मुनिया पैठणीमध्ये साडीच्या मुख्य भागावर पारंपारिक बांधणीचे ठिपके किंवा नक्षी असते, तर काठावर जरीची मुनिया बॉर्डर असते. पीकॉक पल्लू पॅटर्नमध्ये साडीच्या पदरावर सोनेरी जरीचे काम असून त्यावर रंगीबेरंगी पोपट, मोर आणि वेलबुट्टीची नक्षी असते. नववधू किंवा लग्नसमारंभासाठी हा पॅटर्न निवडता येतो. टिश्यू सिल्क मुनिया पैठणी साड्या दिसायला सुंदर असतात आणि नेसायला हलक्या व सोप्या असतात.
सण, लग्न किंवा खास कार्यक्रमासाठी मुनिया पैठणीतील हे पाच पॅटर्न सध्या महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.
Leave a Reply