नाशिकची मिसळ देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकला आलेला प्रत्येक जण आधी मिसळीवर ताव मारतो, तर रविवार हा नाशिककरांचा मिसळवार म्हणून ओळखला जातो. मात्र, हीच मिसळ खाणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या छापेमारीत समोर आलं आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हॉटेल, मसाले आणि दूध डेअरीवर कारवाई करत आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा नाशिकमधील मिसळकडे वळवला आहे. या कारवाईत शामसुंदर, तुषार मिसळ, हॉटेल विहार, कॅफे दुर्गा आणि महाराजा काठियावाडी या पाच हॉटेलवर कारवाई करत त्यांना टाळं ठोकण्यात आलं आहे.
इतर मिसळ हॉटेलमध्ये खळबळ
या कारवाईमुळे शहरातील इतर मिसळ हॉटेलचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिसळीची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालं आहे.
Leave a Reply