दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहिन्याला ३००० रुपये पेन्शन दिली जाते.
पती-पत्नीला मिळून ६००० रुपये
या योजनेत जर नवरा आणि बायको दोघांनाही या योजनेसाठी पात्र ठरले, तर त्यांना मिळून दर महिन्याला ६००० रुपये पेन्शन मिळू शकते. म्हातारपणात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि दैनंदिन खर्चासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
वृद्धापकाळासाठी आर्थिक आधार
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा आधार मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून या लाभाचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply