ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता विदर्भात आधार कार्डाच्या पडताळणीसाठी ज्येष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज नसेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयकडून भारतीय टपाल विभागाकडे घरपोच आधार पडताळणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पोस्टमन थेट घरी येणार
या उपक्रमांतर्गत पोस्टमन आणि टपाल विभागाचे अधिकारी थेट ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन आधार पडताळणी करणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. घरबसल्या पडताळणीची ही सुविधा त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
२२ हजारांहून अधिक ज्येष्ठांना लाभ
या मोहिमेमुळे विदर्भातल्या २२ हजारांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मोहिमेची सुरुवात नागपूरमधून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण विदर्भात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा विदर्भातील सर्व भागांत पोहोचवण्याचे नियोजन आहे.
Leave a Reply