सोनं आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज एका तोळ्यामागे सोनं ७,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर एक किलो चांदी १४,००० रुपयांनी स्वस्त झाली.
आठवडाभरापासून घसरण सुरूच
सोनं-चांदीच्या दरात गेल्या आठवडाभरापासून घसरण सुरू आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी होत आहेत. सातत्याने होत असलेली ही घसरण आजही कायम राहिली. आज सकाळी जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल दिसून आला.
खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दर घसरल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. येत्या दिवसांत दरांची ही घसरण कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply