सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी आनंदाची आहे. आज सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव १ लाख १५ हजार रुपये आहे. भाव कमी झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. लाडक्या लेकीसाठी सोने खरेदी करायचे असेल, तर कोणते पाच दागिने घेता येतील, ते पाहूया.
सोन्याचे पेंडंट
मुलीसाठी सोने घ्यायचे असेल, तर तिला नाजूक सोन्याचे पेंडंट खरेदी करता येते. पेंडंटमध्ये पानांची, फुलांची, फुलपाखराची किंवा हृदयाच्या आकाराची निवड करता येते.
कानातले
मुलीला रोज घालण्यासाठी हलके आणि सुंदर दिसतील असे छोटे कानातले निवडावेत. स्क्रू-बॅक असलेले सोन्याचे टॉप्स किंवा लहान रिंगा यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
सोन्याचे ब्रेसलेट
सोन्याचे ब्रेसलेट घालायची आवड असेल, तर मुलीसाठी खास सोन्याचे ब्रेसलेट बनवता येते. सोन्याचे नाजूक चार्म ब्रेसलेट हातात सुंदर दिसते.
अंगठी आणि सोन्याची चेन
एक ते दोन ग्रॅम सोन्यामध्ये फुलांचा आकार, इन्फिनिटी डिझाइन किंवा खड्याची नाजूक अंगठी बनवता येते. त्याचबरोबर मुलीसाठी सोन्याची चेनही बनवता येते. त्यामध्ये सध्या अनेक नवीन डिझाइन्स उपलब्ध आहेत, त्या वापरून पाहता येतील.
भाव कमी असताना खरेदी केल्यास बजेटमध्ये चांगले दागिने मिळू शकतात. त्यामुळे लेकीसाठी सोने घेण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ योग्य ठरू शकते.
Leave a Reply