भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला वगळण्यात आल्यावरून राजकीय वाद पेटला आहे. या निर्णयावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुंपली आहे. क्रिकेटच्या मैदानात राजकारणाची एंट्री झाल्याची चर्चा आता रंगली आहे.
काँग्रेसचा आरोप काय?
काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी सिराजच्या नावाचा उल्लेख करत या निर्णयावर टिप्पणी केली. सिराजला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयात भेदभाव झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
भाजपचा पलटवार
दुसरीकडे भाजपने काँग्रेसवर पलटवार करत क्रिकेटमध्येही व्होट बँकेचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाच्या आवडीचा खेळ आहे. संघातील प्रत्येक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि खेळात विजय मिळवून देशाची मान उंचावण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. संघातील प्रत्येक खेळाडू हा खेळाडूच असतो, त्यात जात किंवा धर्म पाहिला जात नाही, असेही या चर्चेदरम्यान म्हटले जात आहे.
Leave a Reply