गेल्या काही वर्षांपासून राजकीय उलथापालथीचे केंद्र ठरलेल्या बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. राजधानी ढाक्यापासून अनेक जिल्ह्यांपर्यंत बॉम्बस्फोट, जाळपोळ आणि राजकीय कार्यकर्त्यांमधील संघर्षाच्या घटना समोर आल्या आहेत. या हिंसाचारामुळे देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे.
28 जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट आणि जाळपोळ
बांगलादेशातील 64 प्रशासकीय जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक धक्कादायक घटना म्हणजे अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या चित्तगावमधील वडिलोपार्जित घराला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही, तर सिल्हेट, राजशाही, बारिसाल आणि फरिदपूरमध्ये युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या शाखांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक
या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक करण्यात आली आहे. देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि जाळपोळीच्या घटनांनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. बांगलादेशातील राजकीय संकट आणखी गहिरे होत असून पुढील घडामोडींकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply