मीठ हे केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर फार पूर्वीपासून ते त्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अनेक घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी बेडखाली किंवा घराच्या विविध भागांत मीठ ठेवलेले पाहायला मिळते. पण असे का केले जाते, यामागची नेमकी कारणे आणि फायदे काय आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रात्री बेडखाली मीठ का ठेवतात?
रात्री बेडखाली मीठ ठेवल्याने अनेक फायदे होतात, असे मानले जाते. मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, नकारात्मकता आणि वाईट स्वप्ने यावर उपाय म्हणून मीठ ठेवले जाते. त्यामुळे झोप शांत होते, असे सांगितले जाते.
शांत झोप आणि सकारात्मक ऊर्जा
रात्री झोपण्यापूर्वी बेडखाली मीठ ठेवल्याने शांत झोप मिळते, असे मानले जाते. तसेच, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासही याचा उपयोग होतो, अशी समजूत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये ही पद्धत आजही पाळली जाते.
Leave a Reply