अनेकांच्या घरी एक सवय अगदी सहजपणे लागलेली असते. फोन किंवा लॅपटॉप पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जर काढला जातो, पण भिंतीवरील स्विच मात्र चालूच राहतो. काहीही चार्जिंगला लावलेले नसतानाही स्विच चालू ठेवण्याची ही सवय निरुपद्रवी वाटते, मात्र तिचा परिणाम थेट तुमच्या वीज बिलावर होऊ शकतो.
स्विच चालू ठेवल्यास काय घडते?
चार्जर किंवा इतर कोणतेही उपकरण जोडलेले नसले तरी स्विच चालू असल्यास वीजपुरवठा सुरूच राहतो. अशा स्थितीत थोडी वीज सतत खर्च होत राहते. एका दिवसाचा हा खर्च किरकोळ वाटू शकतो, पण महिनाभर हीच सवय सुरू राहिल्यास एकूण वापर वाढतो आणि त्याचा परिणाम वीज बिलावर दिसून येतो.
वीज वाचवण्यासाठी काय करावे?
चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर केवळ चार्जर काढून न थांबता स्विचही बंद करणे ही सर्वात सोपी सवय आहे. वापरात नसलेली उपकरणे आणि त्यांचे चार्जर स्विचपासून वेगळे ठेवणे, तसेच गरज नसताना स्विच चालू न ठेवणे, यामुळे अनावश्यक वीजवापर टाळता येतो. छोट्या सवयींमधील हा बदल महिन्याच्या वीज बिलात फरक घडवू शकतो.
Leave a Reply