टाकळी ढोकेश्वर : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. डिजिटल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, संभाजी रोहोकले, डॉ. भाऊसाहेब खिलारी, मंगेश खिलारी, शिवाजी खिलारी, अॅड. रघुनाथ खिलारी, जबाजी दाते, गोवर्धन निमसे आदी उपस्थित होते.
डिजिटल शिक्षणामुळे ज्ञानाची नवी दालने खुली
खिलारी म्हणाले, डिजिटल शिक्षणामुळे ज्ञानाची नवी दालने खुली झाली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात वापर वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत. सोनल रोहोकले व बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
माजी विद्यार्थी आणि लोकसहभागातून विद्यालयात तीन लाख रुपये खर्चाचा शुद्ध पाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
Leave a Reply