राज्यात हळूहळू थंडीला सुरुवात होत असतानाच आता पावसाचेही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ अधिक तीव्र होत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.
थंडीची चाहूल लागत असतानाच पावसाची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांचे लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे लागले आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply