हिवाळ्याची चाहूल लागताच वॉर्डरोबमध्ये बदल करण्याची वेळ येते. या ऋतूत अनेकजणी थंडीपासून बचाव करण्याच्या नादात फॅशनकडे दुर्लक्ष करतात. मात्र थंडीपासून स्वतःचा बचाव करत स्टायलिश दिसणे अजिबात अशक्य नाही. कपड्यांच्या योग्य निवडीने आणि काही सोप्या युक्त्यांनी हिवाळ्यातही तुमचा लुक आकर्षक राहू शकतो. बदलत्या ऋतूनुसार वॉर्डरोबमध्ये काही गोष्टी सामील केल्या, तर थंडीचे दिवसही फॅशनचे दिवस ठरू शकतात.
कोट आणि जॅकेटने लुक पूर्ण करा
थंडीच्या दिवसांत लांब कोट हा फॅशनसाठी नेहमीच उत्तम पर्याय मानला जातो. थंडीपासून बचाव करण्यासाठी बहुतेक जण कोट किंवा जॅकेट वापरतात. बाजारात कोट आणि जॅकेटचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. जीन्स, स्वेटर ड्रेस किंवा शॉर्ट्सवरही हे कोट आणि जॅकेट छान दिसतात. त्यामुळे एक चांगला कोट वॉर्डरोबमध्ये असणे हिवाळ्यात खूप उपयोगी ठरते.
लेयरिंग, बूट्स आणि स्कार्फची जादू
हिवाळा हा कपड्यांबाबत प्रयोग करण्यासाठी उत्तम ऋतू आहे. एकावर एक कपडे घालणे म्हणजेच लेयरिंग. जुन्या स्वेटरवर छान जॅकेट किंवा कोट घातला, तर स्टायलिश दिसण्यासोबत थंडीपासूनही सुरक्षित राहता येते. विंटर बूट्सही तुमचा लुक खुलवतात. चेल्सी बूट्स, एंकल बूट्स आणि ओव्हर-द-नी बूट्स असे बूट्सचे अनेक प्रकार असतात. लांब कोट किंवा स्कर्टसोबत ते उत्तम जुळतात. शिवाय स्कार्फ आणि स्टोलची फॅशन कधीही जुनी होत नाही. आज त्यांची क्रेझ वेगाने वाढत आहे. कोणत्याही आउटफिटसोबत स्टोल घेतला, तर लुक अधिक आकर्षक दिसतो.
Leave a Reply