सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र ते कापल्यानंतर लगेच खाल्ले नाही, तर त्याचा रंग काळा पडतो. काळे पडलेले सफरचंद खावेसे वाटत नाही. कापलेले सफरचंद ताजे ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
सफरचंद काळे का पडते?
सफरचंदात असलेली नैसर्गिक एन्झाइम्स हवेच्या संपर्कात येताच ऑक्सिजनशी प्रतिक्रिया करतात आणि त्यामुळे फोडींचा रंग बदलतो. रंग बदलला म्हणजे सफरचंद खराब झाले असे नाही. मात्र कापलेले सफरचंद खूप वेळ उघडे ठेवून खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.
काळे पडू नये म्हणून काय करावे?
कापलेल्या फोडींवर थोडा लिंबाचा रस टाका. लिंबातील सायट्रिक अॅसिड सफरचंदाला काळे होण्यापासून रोखते. कापलेले सफरचंद हवाबंद डब्यात ठेवा. तसेच कापल्यानंतर सफरचंद थंड पाण्यात ठेवा. थंड पाण्यात ठेवल्याने ते काळे पडत नाही.
सफरचंद खाणे कधी टाळावे?
सफरचंदाला विचित्र किंवा आंबट वास येत असेल, किंवा ते नेहमीपेक्षा जास्त मऊ आणि बुळबुळीत झाले असेल, तर ते खाणे टाळावे. अशा स्थितीत सफरचंद खाणे आरोग्यासाठी योग्य नसते.
Leave a Reply