बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सटाणा: १०१ वर्षीय माजी विद्यार्थ्याच्या उपस्थितीत स्नेहमेळावा

सटाणा येथील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. १९६५ पासूनचे माजी विद्यार्थी एकत्र आले; १०१ वर्षीय शिवाजीराव पाटील उपस्थित होते.

सटाणा: १०१ वर्षीय माजी विद्यार्थ्याच्या उपस्थितीत स्नेहमेळावा

सटाणा शहरातील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल १९६५ पासूनच्या माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यासाठी एकत्र येत जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. वयाची १०१ वर्षे पूर्ण केलेले माजी विद्यार्थी शिवाजीराव दगडू पाटील यांची उपस्थिती या मेळाव्याचे खास आकर्षण ठरली.

मेळाव्याची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने झाली. या फेरीत माजी विद्यार्थ्यांसह मान्यवर सहभागी झाले होते. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात परिपाठ झाला. सी. डी. सोनवणे यांनी परिपाठ आणि कवायत घेतली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा परिपाठासाठी उभे राहताना माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बालपणाचा आनंद दिसत होता.

जुन्या वर्गखोल्यांशी पुन्हा नाते

परिपाठानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गांना भेट दिली. बाक, वर्गखोल्या आणि शाळेच्या आवारातील आठवणींशी त्यांनी पुन्हा नाते जोडले. बाबाजी मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे होते. शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील, मविप्र संचालिका शालन सोनवणे, निवृत्त शिक्षक एस. आर. फेगडे, डी. डी. शिंदे, निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नितीन ठाकरे, डॉ. विलास बच्छाव आणि डी. एस. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष किशोर कदम आणि मुख्याध्यापिका जे. बी. देवरे यांनी स्वागत करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.

दोन लाख रुपयांच्या पुस्तकांची भेट

डॉ. विलास बच्छाव, दिलीप सोनवणे, बापू अमृतकार, माजी प्राचार्य डी. डी. शिंदे, जिभाऊ सोनवणे, विलास दंडगव्हाळ, दिलीप चव्हाण, कमल भांगडिया, ॲड. नितीन चंद्रात्रे, विठ्ठल सोनवणे, जगदीश अमृतकर, केशव शिंदे आणि चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगतातून जुन्या आठवणी जागवल्या. प्रताप दिघावकर यांनी सटाणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपयांची पुस्तके भेट देण्याची घोषणा केली. मराठा हायस्कूलचा माजी विद्यार्थी हीच आपली ओळख असून आपल्या जडणघडणीत शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रसाद सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अनिल पाटील यांनी आभार मानले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance