गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार

आयएमए महाराष्ट्र शाखेचा बेस्ट सेक्रेटरी हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना नागपूर येथील सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय बेस्ट सेक्रेटरी पुरस्कार

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्रेटरी – बिग ब्रँच (२०२५-२६) हा राज्यस्तरीय पुरस्कार आयएमए जळगाव शाखेचे मानद सचिव डॉ. भरत बोरोले यांना प्रदान करण्यात आला.

नागपूर येथील आयएमए हाऊस येथे आयोजित ६६ व्या वार्षिक राज्य परिषद मॅस्टाकॉन-२०२६ व आयएमएकॉन-२०२६ या भव्य सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटन व पदग्रहण समारंभास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार तुषार राठोड, आयएमएचे राष्ट्रीय नियोजित अध्यक्ष डॉ. जयेश लेले तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोहळ्यात आयएमए महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयेश लेले, नवनिर्वाचित राज्याध्यक्षा डॉ. मंजुषा गिरी आणि राज्य सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते डॉ. भरत बोरोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, कार्यकारी सदस्य डॉ. अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे आदी उपस्थित होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance