गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिव्यांग पेन्शन २,५०० वरून ६,००० करण्याची मागणी

आमदार हिरामण खोसकर यांनी दिव्यांग पेन्शन २,५०० वरून ६,००० रुपये करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार आहेत.

दिव्यांग पेन्शन २,५०० वरून ६,००० करण्याची मागणी

हात नाही, पाय नाही, डोळ्यांना जग दिसत नाही… काहींना स्वतःच्या हाताने अन्नही खाता येत नाही. अपघात, पोलिओ अथवा जन्मजात व्याधींमुळे आयुष्यभर दुसऱ्यांच्या आधारावर जगावे लागणाऱ्या दिव्यांग बांधवांना आता तरी सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारी २,५०० रुपयांची मासिक पेन्शन सहा हजार रुपये करण्यात यावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महागाईत तुटपुंजी मदत

आजच्या महागाईच्या काळात औषधोपचार, दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी आणि घरखर्च भागवताना दिव्यांग कुटुंबांची अक्षरशः दमछाक होत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील परिस्थिती तर आणखी गंभीर आहे. अशा परिस्थितीत २ हजार ५०० रुपयांची मदत ही आधार नसून केवळ तुटपुंजा दिलासा ठरत आहे, अशी खंत खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष

खासदार राजाभाऊ वाजे यांनीही केंद्र सरकारकडे दिव्यांगांच्या या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. सरकार हिवाळी अधिवेशनात काय निर्णय घेते, याकडे राज्यातील दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance