विमानात प्रवास करताना स्वागतापासून ते संपूर्ण प्रवासात प्रवाशांची मदत करण्याची जबाबदारी एअर होस्टेसवर असते. या नोकरीसाठी परीक्षा द्याव्या लागतात आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतरच एअर होस्टेस म्हणून काम करण्याची परवानगी मिळते. मात्र या नोकरीची एक चिंताजनक बाजू एका एअर होस्टेसनेच समोर आणली आहे.
कंपनीच्या नियमानुसार मेकअप बंधनकारक
संगिता सेन नावाच्या एअर होस्टेसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने सांगितले की, चेहरा सुंदर दिसावा म्हणून एअर होस्टेसला नेहमीच मेकअप करावा लागतो. कंपनीच्या मानकांनुसार फाउंडेशन आणि आयलायनर लावून पूर्ण मेकअपमध्येच जावे लागते. कोणी आपल्याकडे पाहते की नाही, किंवा सौंदर्याची स्तुती करते की नाही, याचा फरक पडत नाही; कंपनीच्या नियमानुसार मेकअप करावाच लागतो, असे तिने सांगितले.
बारा तासांनी मेकअप, त्वचेवर परिणाम
प्रत्येक बारा तासांनी हा मेकअप करावा लागतो. हा मेकअप करून करून चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे घासून निघते, असे संगिताने सांगितले. मेकअपला कंटाळून गेल्याचेही तिने मन मोकळे करून सांगितले. पार्टी, मिटिंग किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना ती मेकअप करून जात नाही, कारण चेहऱ्याच्या त्वचेला आराम मिळणे गरजेचे आहे. एअर होस्टेसचा मेकअप करणे एवढे सोपे नाही, पण ते करावेच लागते, असे तिने व्हिडिओत म्हटले आहे.
Leave a Reply