परभणी येथे २९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण समाजासाठी हा २१ वा राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा परभणीतील वैष्णवी मंगल कार्यालय येथे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा चालणार आहे.
## उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे
या मेळाव्याचे उद्घाटन बंडूनाना सराफ यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी योगेश जोशी सोनपेठकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल आंबेगावकर आणि परळी वैद्यनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर, धनंजय नारळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख योगेश धर्माधिकारी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेश देहेडकर, बीडचे जिल्हाप्रमुख अभय जोशी आणि नांदेड येथील ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष अनिल डोईफोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
## नावनोंदणी सुरू
मेळाव्यासाठी सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम विवाह इच्छुक वधू-वरांसह घटस्फोटित, विधवा, विधूर आणि दिव्यांग वधू-वरांची नावनोंदणी सुरू आहे. इच्छुकांना प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणीही नावनोंदणी करता येणार आहे. विवाह इच्छुक वधू-वरांनी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा स्वागताध्यक्ष दीपक कासांडे, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार पराडकर, विठू गुरु वझुरकर, जिल्हा संघटक श्वेता आचार्य, तालुकाध्यक्ष प्रताप कुलकर्णी आणि शहराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
Leave a Reply