श्री क्षेत्र लेण्याद्री येथे शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि डिसेंट फाउंडेशन यांच्या वतीने हे शिबिर होणार आहे. आरोग्य तपासण्या आणि उपचार मोफत मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन आणि वेळ
शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणेचे अध्यक्ष डॉ. मानसिंग साबळे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपस्थित राहणार आहेत. ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सचिव शंकरराव ताम्हाणे यांनी दिली. लेण्याद्री येथील यात्री निवास भाग क्रमांक २ येथे सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हे शिबिर पार पडेल.
कोणत्या तपासण्या मोफत मिळणार
या शिबिरात मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग व मधुमेह तपासणी, कर्करोगाची पूर्व तपासणी व जनजागृती, तसेच हाडांचे व सांधेदुखीचे आजार यांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय आयुर्वेदिक उपचार, व्यायाम मार्गदर्शन, मोफत औषधे व चष्म्यांचे वाटप आणि आवश्यक रुग्णांवर विविध शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आयुष्मान वय वंदना योजनेची नोंदणी, तसेच दिव्यांगांना साहित्याचे वाटप व नोंदणी केली जाणार आहे.
Leave a Reply